तुमच्यासाठी कायपण!!! उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांनी मोडला प्रोटोकॉल

तुमच्यासाठी कायपण!!! उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांनी मोडला प्रोटोकॉल

वाशिम | एकमेकांवर सतत टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असं दृश्य पाहून भाजप शिवसेनेच्या युतीचे संकेत मिळत आहेत. 

वाशिम जिल्ह्यातील विकासकामांच्या भूमिपूजनासाठी दोघे एकत्र आले होते. त्यानंतर  यवतमाळ येथील कार्यक्रमाला जाताना मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रवास केला. 

कार्यक्रमाला निघताना मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल मोडला आणि आपला ताफा सोडून उद्धव ठाकरेंच्या बुलेट प्रुफ टाटा सफारीत प्रवास केला.

दरम्यान, यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हेही तिथं उपस्थित होते. मात्र या प्रकारामुळे सेना-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी वाजवला ‘युतीचा नगारा’?

-शिवसेना आणि मनसे या पक्षांनी मुंबईतील मराठी माणसांसाठी काहीच केलं नाही!

-शरद पवार नारायण राणेंच्या घरी; राणे खरंच राष्ट्रवादीसोबत जाणार???

-आला रे आला… मराठमोळा टच असलेला ‘सिम्बा’चा ट्रेलर आला!

-मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल; आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा

Google+ Linkedin