बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; विरोधी पक्ष नेत्यांनी केलं स्पष्ट

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असताना महाराष्ट्र पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले होते. मुंबईतील कोरोनाची आकडेवारी वाढले असताना मुंबईची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल देखील सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. मुंबई लोकल आता पुन्हा कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत असताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई लोकल सर्वसामान्य लोकांसाठी सुरू करण्यास सकारात्मक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करण्याबाबत प्रवीण दरेकर यांनी मागणी केली होती तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला होता.

लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रवीण दरेकर यांच्यात फोनवरून चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनी आपण मिळून यावर तोडगा काढू असं म्हणत करू ना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना प्रवास करण्यास परवानगी देता येऊ शकते का, याचा विचार करू शकतो असं म्हटलं आहे.

मुंबई लोकल बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारमध्ये हालचाली सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकार व विरोधी पक्ष मिळून यावर तोडगा काढू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणत मुंबई लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याचं मत व्यक्त केलं असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More