Top News

सोनिया गांधी मेलेल्या उंदरासारख्या; हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

चंदीगड | हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींवर टीका करताना जीभ घसरली आहे. मुख्यमंत्री खट्टर यांनी सोनिया गांधींची तुलना मेलेल्या उंदरासोबत केली आहे. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी संपूर्ण देश फिरला. पण डोंगर पोखरला आणि त्यात मेलेलं उंदीर मिळाला, असं खट्टर यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रासह हरियाणातही विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे.  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व नेते एकमेकांवर टीका करत आहेत. मुख्यमंत्री खट्टर यांची जीभ घसरल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली  जात आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव पत्कारल्यानंतर राहुल बाबा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सांगितलं की, नवीन अध्यक्ष आणा. नवीन अध्यक्ष हा गांधी कुटुंबाच्या बाहेरील असावा, असं खट्टर म्हणाले.

आम्हाला वाटलं चांगली गोष्ट आहे  घराणेशाही बंद होत आहे चांगलं आहे. पण हे लोक नव्या अध्यक्षासाठी संपूर्ण देशभर फिरले. पण तीन महिन्यानंतर सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी बसवण्यात आले. याचा अर्थ डोंगर पोखरला आणि मेलेला उंदीर मिळाला, असं खट्टर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या