शेतकरी संपाआडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव- मुख्यमंत्री

मुंबई | शेतकऱ्यांच्या संपाआडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शेतकरी संपाबाबत भूमिका मांडण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शेतकरी आणि पोलिसांची झटापट होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडावी, असं त्यांचं नियोजन आहे, असा गंभाीर आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच या संपाद्वारे शेतकऱ्यांनाच वेठीस धरलं जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या