मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांचा वाढता आलेख लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कठोर पाऊले उचलून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि योग्य ती कारवाई करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
कोरोनाला अजूनही लोकांनी गंभीरपणे घेणं गरजेचं आहे. धोका अजून टळलेला नाही. म्हणून नियमांचं काटेकोर पालन होईल याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
संचारबंदी आणि नियम कडक करायचे की नाही? हे सर्वस्वी जनता ठरवणार आहे. लोकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेण्याची जबाबदारी पोलीस आणि जिल्हा प्रशासनावर आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास शिथिलता न दाखवता कडक कारवाई करावी, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत.
ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटल आणि इतर आरोग्य यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का? याची खात्री करून घेणं आणि त्याचबरोबर लग्न समारंभ, उपहारगृह आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नियमांचं काटेकोर पालन होत नाही. त्यामुळे अशा गोष्टींवर तात्काळ भेटी देऊन कारवाई करण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
थोडक्यात बातम्या-
लॉकडाऊनसंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
पुण्यातील ‘या’ भागात विद्यार्थ्यांसाठी सरकार 9 मजली भव्य वसतीगृह उभारणार!
‘लिहून घ्या, …त्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस’; भाजपच्या या आमदाराने सांगितली वेळ!
…म्हणून पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला पुन्हा अटक
मुलीनं काही बरं वाईट केलं तर त्याला राष्ट्रवादीचा नेता जबाबदार- तृप्ती देसाई