बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांना 12वीपर्यंत माेफत शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद”

नवी दिल्ली | जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कित्येकांना या महामारीमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक मुलं कोरोनामुळे अनाथ झाली आहेत. अशा अनाथ झालेल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिलेला असताना आता महाराष्ट्र शासन या मुलांच्या भविष्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे करण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता. या प्रस्तावाला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड ट्वीट करत म्हणाल्या की, कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा 1 ली ते 12वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच आवश्यक निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!

दरम्यान, वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी राज्य सरकार कसोटीने प्रयत्न करीत आहे. काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या व भविष्यात गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावात दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याची शक्यता तपासण्याची परवानगी दिल्याबद्दल देखील मुख्यमंत्र्यांचे आभार.

थोडक्यात बातम्या – 

“उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार”

“नरेंद्र मोदींना त्यांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री करायचं नाही”

…तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवता येईल – मोदी सरकार

सोन्याचा भाव आज पुन्हा उतरला, वाचा ताजे दर

काॅंग्रेसला बाजूला ठेवत राष्ट्रवादी तिसरा फ्रंट काढणार? पवारांच्या बैठकीमुळे चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More