बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी दिले लाॅकडाऊनचे संकेत, दोन दिवसात होणार मोठा निर्णय!

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन पडणार की काय? याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं होतं. आता कोरोना रूग्णसंख्या 13 हजाराच्या घरात गेल्यानं राज्यातील काही भागात पुन्हा लाॅकडाऊन करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यानी यावेळी दिले आहे. तर लवकरच येत्या एक दोन दिवसात राज्याच्या काही भागात लाॅकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिली आहे.

सध्या कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने राज्य सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना दैनंदिन व्यवहारांवर काही निर्बंध आणण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर राज्यातील जनतेला 8 दिवसांचा अल्टीमेटम देखील दिला होता.

प्रशासनासोबत महत्वाची बैठक लवकरच होणार असून त्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जातील. असे स्पष्ट संकेत दिले गेले आहेत. याआधी लाॅकडाऊन करण्याची सरकारची इच्छा नाही. लाॅकडाऊन टाळायचं असेल तर नियमांच काटेकोर पालन केलं पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

दरम्यान, मुंबई आणि पुण्यातही पुन्हा नवे निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. पुण्याचेे महापौर मुरलीधर मोहळ यांनीही पुण्यात नव्यानं निर्बंध लावले जाण्याची शक्यता वर्तवली आहे.

थोडक्यात बातम्या-

विराट कोहलीला मोठा धक्का; ‘या’ स्टार क्रिकेटपटूनं ऐन क्षणी घेतली माघार!

अखेर माय-लेकीची भेट झाली… पाकिस्तानातून आलेल्या ‘त्या’ मुलीला साडेचार वर्षांनी कळलं खरं नाव

विजय हजारे ट्रॉफीत पुन्हा ‘पृथ्वी’ वादळाचा तडाखा; गोलंदाज हतबल होऊन पाहातच राहिले!

सेक्स न करताच तरुणी प्रेग्नंट झाल्यानं खळबळ, डॉक्टरही झालेत हैराण

आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंवर कारवाई व्हावी; ‘या’ खेळाडूच्या मागणीनं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More