बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2 तारखेनंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबद्दल निर्णय घेतील, राजेश टोपेंनी दिले संकेत!

जालना | राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. औरंगाबाद, नांदेड, नागपूर, बीड, अमरावती या शहरामध्ये मिनीकोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लॉकडाउन केले आहे. महाराष्ट्रात देखील लॉकडाऊन लागण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, 2 एप्रिलनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउनचा निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. स्थानिक परिस्थिती आणि सोयीसुविधा पाहून जिल्हे बंद करण्याचा निर्णय तेथील प्रशासनाने घेतला आहे. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यु लावला आहे.

काही जिल्ह्यांमध्ये 5 दिवस तर काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. मात्र ICMR च्या नियमाप्रमाणे किमान 15 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असतो. तरच कोरोनाची साखळी तुटेल. कोरोना रुग्ण बरा होण्याला 15 दिवस लागतात, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहर आणि इतर तालुक्यातसुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना पाहायला मिळत आहेत. कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले असले तरी येथे कोरोनाला थोपवण्यात यश येताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने आता औरंगाबादेत देखील लॉकडाऊन लागू केला आहे. 30 मार्च ते येत्या 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

संजय राऊतांनी ट्विट करत दिला सूचक इशारा, म्हणाले…

राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

वकील असलेल्या पत्नीनेच केली पतीची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत, मी त्यांच्यापुढे छोटा आहे- सचिन सावंत

गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावं, ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणं हे बरं नाही- संजय राऊत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More