बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वानखेडे प्रकरणी आता मुख्यमंत्री लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र”

मुंबई | एनसीबीनं छापा टाकलेले मुंबई क्रुझ प्रकरण सध्या चांगलंच तापलं आहे. यामध्ये आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडेही गुंतत चाललेले पहायला मिळत आहे. यातच आता राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तर समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहे. आता या वानखेडे प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.

सध्या समीर वानखेडेंवर लाचखोरी, जातीचा बनावट दाखला, खंडणी वसुली असे अनेक आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात पंच प्रभाकर साईल यांनीही गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण गुंतागुंतीचं होत चाललं आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार असून ते मोदींकडे काय मागणी करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

मंगळवारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट झाली. या भेटीनंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी कारवाई होणार असल्याचं सांगितलं. ही कारवाई व्यक्तीवर होणार नसून घटनेवर आधारित असणार आहे, असंही मलिक म्हणाले.

दरम्यान, या भेटीनंतर मुंबई पोलीस दलात हालचालींना वेग आला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहे. मुंबई पोलिसांकडे 5 वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

बाप बापच असतो! ग्रामपंचायत निवडणुकीत बाप-लेक भिडले अन्…

”ती’ खोली हेच स्वातंत्र्याचं खरं सत्य’; सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर कंगना भारावली

देशासमोर नवं संकट! ‘या’ राज्यात सापडला कोरोनाचा नवा व्हेरियंट

“त्यांना हवं असेल तर ते मला गोळ्या देखील घालू शकतात”

“तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More