Top News महाराष्ट्र मुंबई

‘ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार’; फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री म्हणाले….

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ओबीसी प्रवर्गातील समाजाला त्यांच्या हक्काचं जे असेल त्यातील एक कणही कमी होऊ देणार नाही. जे हक्काचं आहे ते त्यांना देऊच उगाच त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

ओबीसी समाजामध्ये गैरसमज पसरवू नका. विरोधकांनी राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करु नये. विरोधकांनी राज्यातील एकजुटीला तडा देऊ नये, असंही ठाकरे म्हणाले.

दरम्यान, जर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा. आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीसांनी दिला होता.

थोडक्यात बातम्या-

 चांगली बातमी! राज्यातील ‘हा’ तालुका झाला कोरोनमुक्त

“महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?”

‘मला तोंड फोडण्याची धमकी दिली होती आणि आता…’; कंगणाचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण

‘अवघ्या सात तासाच्या अधिवेशनात जनतेचे प्रश्न कसे मांडायचे?’; फडणवीसांचा सरकारला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या