Top News महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?”

मुंबई | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. काही वेळापुर्वी पत्रकार परिषद घेत त्यांनी हे आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

विरोधकांचं मागचं वर्ष सरकार कधी पडेल? किंवा सरकार कधी पडणार? याचे मुहूर्त शोधण्यात गेले. त्यामुळे सरकारने काय कामं केली त्याकडे त्यांचं लक्ष गेलं नाही, असंही ठाकरे म्हणाले.

दरम्यान, निसर्ग वादळ असेल, अवकाळी पाऊस अशी अनेक संकटं राज्यावर आली तरीही त्यातून हे सरकार मार्ग काढतं आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे

थोडक्यात बातम्या-

‘मला तोंड फोडण्याची धमकी दिली होती आणि आता…’; कंगणाचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण

‘अवघ्या सात तासाच्या अधिवेशनात जनतेचे प्रश्न कसे मांडायचे?’; फडणवीसांचा सरकारला सवाल

…तर मुंबईत महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा- रामदास आठवले

“मन खचून गेले हे बघून….त्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती बघायला मिळते”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या