Top News महाराष्ट्र मुंबई

“शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार” स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्याचा निर्धार!

मुंबई | सरकारकडून गावोगावी आरोग्याची उत्तम सेवा पुरवणार जाणार असून कामगारांचे हित प्राधान्याने जोपासले जाईल. तसेच शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. मंत्रालयात ध्वजारोहण केल्यानंतर जनतेला संबोधित करताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारडून करण्यात येणाऱ्या कामांचा पाढा वाचला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, लाॅकडाऊनच्या काळातही विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहावं, यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.  ऑनलाइन शिक्षण सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरले आहे. तसेच अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यावर आज तब्बल 60 हजार उद्योग सुरू करण्यातही राज्य सरकार यशस्वी ठरलं आहे.

मराठी माणसाला रोजगार मिळावा यासाठी महाजाॅब पोर्टलचे ऑनलाईन APP देखील सरकारकडून सुरु करण्यात आलं आहे. तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू करणार असून सर्वसामान्यांना घरं मिळावीत हा यामागील उद्देश असल्याचं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे.

कोरोनाच्या काळातील वैद्यकीय यंत्रणेचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस  कर्मचाऱ्यांचा कोव्हिड योद्धा म्हणून यावेळी गौरवही केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

जे दिसतात ते सोबत नसतात, जे सोबत असतात ते दिसत नाहीत- उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

स्वातंत्र्यदिनाला गालबोट; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

‘मेक इन इंडिया’ सोबत ‘मेक फॉर वर्ल्ड’ हा मंत्रही अंगीकारला पाहिजे- नरेंद्र मोदी

…याची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या