बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचं संकट पावसाळ्यापूर्वी परतवून लावायचंय… शासनाला सहकार्य करा- उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोनाचं संकट आपल्याला पावसाळ्यापूर्वी म्हणजेच जूनपर्यंत परतवून लावायचं आहे. जनजीवन आपण पूर्वपदावर आणायचं आहे, पण हे सुरळीत होण्यास वेळ लागेल, आपण जेवढी खबरदारी घेऊ तेवढं लवकर आपण या बंधनातून मुक्त होऊ, असं मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आज चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी शासन करत असलेल्या उपापयोजना तसंच लॉकडाऊनविषयी त्यांनी माहिती दिली.

जूनपर्यंत आपल्याकडे शाळा कॉलेज सुरु होत असतं. मी कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देणार नाही. परत आपल्याला अ‌ॅडमिशन करायचे आहेत, हे सर्व गरजेचे आहे. आता आपल्याला जनजीवन पुन्हा सहजतेने जगायला सुरुवात करायची आहे, मात्र हे सुरळीत करायला अजून वेळ लागणार आहे. तेव्हा जनतेने संयम ठेवायला हवा, असं ते म्हणाले.

दरम्यान, आतापर्यंत जसं सहकार्य केलं तस यापुढेही कराल याची आशा बाळगतो, असं म्हणत लवकरच आपण या संकटावर मात करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ट्रेंडिंग बातम्या-

मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद

अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड

महत्वाच्या बातम्या-

“40 हजार एकरपेक्षा जास्त जमीन नव्या उद्योगांसाठी राखीव, माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार”

लॉकडाऊन नसतं तर काय झालं असतं याची कल्पना करवत नाही – उद्धव ठाकरे

कोरोना रूग्णांसाठी मुंबईत 1 हजार बेड्सचं रूग्णालय; सरकारकडून महापालिकेकडे सुपूर्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More