Top News महाराष्ट्र मुंबई

“लोकहो, घरात व्यायाम करा, ज्यांना त्रास आहे त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवा; आपल्याला युद्ध जिंकायचंय”

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन काळात नागरिकांनी घरीच बसावं. घर हे आपले गडकिल्ले आहेत. तसंच लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरात व्यायाम करावा, ज्यांना हृदयाचा किंवा रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवावं, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

आपण जर जीवनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क घालून घराबाहेर पडा. मास्क नसल्यास साध्या कापडाच्या 2 ते3 करून वापरा. प्रत्येकाचं कापड वेगळं असावं. गरम पाण्याने धुवून पुन्हा ते वापरले तरी चालेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

तसंच राज्याची आरोग्य व्यवस्था आता चार विभागात काम करणार असल्याचंही ते म्हणाले. सर्दी खोकला ताप असलेल्यांसाठी सर्वत्र फिवर क्लिनिक असतील. सौम्य कोवीड लक्षणं असणाऱ्यांसाठी स्वतंत्र रूग्णालये असतील. मध्यम लक्षणांसाठी वेगळी रूग्णालये असतील.  तर तीव्र लक्षणांसाठी अद्ययावत रूग्णालये असतील, अशी माहिती त्यांनी यावेळी महाराष्ट्राच्या जनतेला दिली.

दरम्यान, वुहान शहराच्या सीमा आजपासून खुल्या करण्यात आल्या आहेत. तब्बल 76 दिवसांनी त्यांनी आज शहराच्या सीमा खुल्या केल्या आहेत. हा संयमाचा विजय आहे. आपल्याकडेही अशा संयमाची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ट्रेंडिंग बातम्या-

“मुंबई अडीच लाख कोटी केंद्राला देते, त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला द्या”

358 तहसील आणि 44 हजार गावं तर एका गावाला किती शिवथाळी??; भाजपचा सवाल

महत्वाच्या बातम्या-

“केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको”

…म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी केलं अटक

‘ट्रोलर्सच्या पाठीमागे फडणवीस अन् डावखरे तर नाहीत ना?’; आव्हाड प्रकरणावरून राष्ट्रवादी युवक आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या