मुंबई | कोरोनामुळे देशात 3 मेपर्यंत वाढलेला लॉकडाऊन आणि वांद्र्यात उसळलेल्या जीवघेण्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने भीम सैनिकांनी पाळलेल्या शिस्तीबद्दल उद्धव ठाकरे यांनी भीम सैनिकांचे विशेष धन्यवाद मानले.
अनेक गावातून, खेड्यापाड्यातून गोर गरिब, बाबासाहेबांचे भक्त आणि फक्त भक्तच नव्हे तर सर्वचजण तिथे येऊन महापुरुषाला अभिवादन करतात. कृतज्ञता व्यक्त करतात आणि शांतपणे आपल्या घरी परत जातात. पण आज मी भीमसैनिक आणि बाबासाहेबांच्या भक्तांना धन्यवाद एवढ्यासाठी देतो की, त्यांनीसुद्धा अत्यंत शिस्तीत किंबहुना शिस्त पाळत गर्दी न करता महापुरुषाला मानवंदना दिली. त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो, असं उद्वव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी 6 महिन्याच्या बाळाला आणि 83 वर्षांच्या वयोवृद्धांना कोरोनाशी लढा देऊन बरं होताना पाहिलं आहे. तुम्हालाही हे माहिती असेल. याच्या बातम्याही आल्या आहेत. त्यामुळे कोरोनातून बरं होता येतं हा विश्वास ठेवा, असं आवाहनही ठाकरेंनी नागरिकांना केलं .
ट्रेंडिंग बातम्या-
धार्मिक तेढ निर्माण करणारा संदेश टाकणाऱ्यासह दहा ग्रुप अॅडमीनवर गुन्हा दाखल
‘लॉकडाउनचे चटके सोसणाऱ्यांच्या अन्न-सुरक्षेची काळजी घ्या’; सोनियांचं मोदींना पत्र
महत्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदींनी सांगितली सप्तपदी… नागरिकांना सूचना पाळत साथ देण्याचं केलं आवाहन
देशभरातला लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
अन्य देशांच्या तुलनेत भारताने लवकर पावलं उचलली म्हणूनच भारत मोठ्या संकटापासून वाचला- नरेंद्र मोदी
Comments are closed.