बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

मुंबई | विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मुख्यमंत्री उमेदवार असलेली निवडणूक बिनविरोध करण्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात संकेत आहेत. त्यानुसार सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने संख्याबळानुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 तर भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडले गेले. या सर्वांचा शपथविधी आता सोमवारी 18 मे रोजी होणार आहे.

सर्व नवनिर्वाचित आमदार 18 मे रोजी दुपारी 1 वाजता विधानपरिषद सभापतींच्या उपस्थितीत विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व 9 उमेदवारांचा शपथविधी सोमवारी विधानपरिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

काळा पैसा भारतात आणण्याची मोदींना संधी; शिवसेनेचा सल्लावजा टोला

कदाचित कोरोना विषाणू कधीच संपणार नाही; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली भिती

महत्वाच्या बातम्या-

कोल्हापुरात परप्रांतिय मजुरांचा उद्रेक; हजारो मजूर रस्त्यावर

देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादेत गुपचूप उरकली बैठक, ‘या’ विषयावर चर्चा झाल्याची शक्यता

…म्हणून मला उमेदवारी दिली नसेल- चंद्रशेखर बावनकुळे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More