Top News

उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे बेटा- सिंधुताई सपकाळ

Loading...

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचं कळतंय. महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटाशी उद्धव ठाकरे ज्या प्रकारे लढत आहेत ते पाहून सिंधुताई सपकाळ यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे सगळी जबाबदारी तू उत्तमरित्या पेलतो आहेस, असं सिंधुताई सपकाळ म्हणाल्या आहेत. दोघांमध्ये फोनवरुन संभाषण झालं.

एवढा सिंपल मुख्यमंत्री कुठेही बदल नाही तुझ्यात. पावलं उचलताना वाटलं नव्हतं तू एवढा खंबीर होशील. महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे बाळ तू पण काळजी घे बेटा, असं सिंधुताई सपकाळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या प्रकारे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत ते पाहून सिंधुताई सपकाळ यांनीही त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवा अन्…- शोएब अख्तर

‘रामायण’ मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारणारे श्याम सुंदर काळाच्या पडद्याआड

महत्वाच्या बातम्या-

‘तुम्ही आम्हाला अडवलं का?’; औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारांकडून पोलिसांना मारहाण

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच जणांना अटक

आमदारांच्या वेतनातील 30 टक्के कपातीला ठाकरे सरकारची मंजुरी

,

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या