Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली ‘ही’ कळकळीची विनंती!

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी आज संवाद साधला. केंद्र सरकारने अनलॉक १.० जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय घोषणा करतात याकडे सगळ्याचं लक्षा लागलं होतं.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांना एक कळकळीची विनंती केली आहे. आपल्याला कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर दुखणं अंगावर काढू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे होणारा मृत्यूदर आपल्याला शून्यावर आणायचा आहे, मात्र कोरोना रुग्ण आजार बळावल्यावर म्हणजेच अगदी शेवटच्या क्षणाला रुग्णालयात भरती होत आहेत, त्यामुळे वेळेत उपचार होत नाहीत आणि मृत्यूदर वाढतो, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, माझा एक निष्ठावान कार्यकर्ता चाचणीसाठी रुग्णालयात गेला आणि तिथंच कोसळला. लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यावर काय होतं, हेच याद्वारे मुख्यमंत्र्यांनी सर्वाच्या निदर्शनास आणून दिलं.

ट्रेंडिंग बातम्या-

मला सरकारची चिंता नाही… सरकार कुणी पाडू शकत नाही- उद्धव ठाकरे

सॅनिटायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान; होऊ शकतो ‘हा’ धोका!

महत्वाच्या बातम्या-

“जवळपास 28 हजार रुग्ण बरे झालेत, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून दु:ख होतं”

हळू हळू सगळं सुरू करू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘पुन:श्च हरी ओम’चा नारा!

पुण्यात 138 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या