Top News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबाद विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय; मुख्यमंत्र्यांचं केंद्राला पत्र

मुंबई | औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र पाठवलं आहे.

औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पत्रात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांनी लिहिलं आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादच्या विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला असल्याचं पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी, अशी विनंतीही ठाकरेंनी पत्रात केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरलात’; नाव घेता पडळकरांची शरद पवारांवर टीका

जगात भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्यांसाठी असते का एखादे भारतरत्न- भाजप

संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल तर तर दुसरं नाव सांगा- चंद्रकांत पाटील

…तर मग यावर्षीचा प्रजासत्ताक दिन सोहळा रद्द का करू नये?- शशी थरूर

‘…तर नेपाळ भारतात असता’; प्रणब मुखर्जींनी आपल्या अखेरच्या पुस्तकात सांगितली राज की बात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या