कोरोनाच्या धास्तीनं मुख्यमंत्र्यांनी ड्रायव्हरला दिली सुट्टी; स्वत: गाडी चालवत मंत्रिमंडळाच्या बैठकीला रवाना
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ परिसरातील चहा विक्रेत्याची ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आली. चहावाल्याच्या संपर्कात त्यांचे अंगरक्षक आल्याने त्यांन चौघांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाताना स्वत: गाडी चालवत गेली आहे.
सरकारची मर्सिडीज टाळून उद्धव ठाकरे यांनी स्वतःची गाडी वापरली. दोन आठवड्यापूर्वीही उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत बैठकीला गेले होते. त्यावेळी त्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मागच्या सीटवर बसले होते, यावेळी मात्र मुख्यमंत्री गाडीने एकटेच गेले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असले तरी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडणार आहे. राज्यात ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात.
दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत ते गाडीत एकटेच होते, तर ‘कोरोना’पासून बचावासाठी त्यांनी चेहऱ्याला मास्कही लावला होता.
ट्रेंडिंग बातम्या-
कौतुकास्पद! चार वर्षांच्या मुलाने सायकलसाठी जमवलेले 971 रुपये दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
महत्वाच्या बातम्या-
“मुर्खांसोबत सरकार चालवता चालवता अजित पवारांना लोक पण मूर्ख वाटायला लागलेत?”
‘कोरोना’शी लढणाऱ्या ‘देवदुता’चं कर्तव्याला प्राधान्य; आईला ‘व्हिडीओ कॉल’मधून अखेरचा निरोप
ट्रम्प यांची भारताला धमकी; राहुल गांधींचं सणसणीत प्रत्युत्तर
Comments are closed.