महाराष्ट्र मुंबई

‘जनता कर्फ्यू’चे दिवस वाढवणार; संजय राऊतांनी दिले संकेत

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या जनता कर्फ्यूला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या जनता कर्फ्यूमध्ये वाढ केली जाऊ शकते, असे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.

आजची जनता कर्फ्यू ही ट्रायल आहे. खरे तर महाराष्ट्रात आठ दिवसांपूर्वीच कर्फ्यू लावायला हवी होती. कठोरपणे जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करायला हवी होती. लोकांची गर्दी टाळायची असेल तर हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनता कर्फ्यू वाढवू शकतात, असं वाटतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

लोकांना प्रेमानं आवाहन करून चालणार नाही. कठोर निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी चीनच्या हुकूमशाहीचा आदर्श ठेवावा लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, कोरोनाबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील. आता खुर्ची नाही, तर राज्य वाचवण्याची गरज आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

जनता कर्फ्यू दिवशी घरी बसून करा ‘हे’ काम; रामदेव बाबांचा भन्नाट सल्ला

एक विषाणू देवावर आणि धर्मावर भारी पडला; संजय राऊत यांचा प्रबोधनात्मक अग्रलेख

महत्वाच्या बातम्या-

जनता कर्फ्यूबाबत रितेश-जेनेलियानं भारतीयांना केली विनंती; पाहा व्हिडीओ

“मोदींनी केलेल्या आवाहनाची खिल्ली उडवू नका… माझे कुटुंब देखील कॉरन्टाईन”

संजय राऊत यांच्या ‘देवांनी मैदान सोडलं’ या अग्रलेखाचं काँग्रेसकडून जोरदार स्वागत

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या