बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज- उद्धव ठाकरे

मुंबई | निसर्ग या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला होता त्यावेळीही त्यांनी निसर्ग चक्रीवादळाचं संकट महाराष्ट्रासमोर आहे आणि या संकटात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन केलं होतं.

या वादळाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राने तयारी केली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

मच्छिमारांना समुद्रात बोलावून घेण्यात आलं आहे, जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच या चक्रीवादळात मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या 16 तुकड्यांपैकी 10 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर 6 तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी आणि लाऊडस्पीकर याद्वारे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासाठी पक्की निवास गृह तयार ठेवण्यात आली आहेत. तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषतः सखल भागातील झोपडपट्टीवासीयांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं उद्धव ठाकरेंनी सांंगितलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

देशातली कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांजवळ, गेल्या 24 तासांत तब्बल इतक्या जणांना कोरोना!

आनंदाची बातमी… 6 वर्षीय चिमुरडीची आणि 66 वर्षीय वृद्धाची कोरोनावर यशस्वीरित्या मात!

महत्वाच्या बातम्या-

‘इंडिया’ नको ‘भारत’ नावानेच देशाची ओळख व्हावी; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो का ट्रेंड होतंय?, जाणून घ्या कारण

कौतुकास्पद! घरी परतणाऱ्या कामगारांना मोहम्मद शमी करतोय अन्नदान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More