‘मला एकाच गोष्टीचं वाईट वाटलं…’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक
मुंबई। महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांसोबत बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मला कोणताही मोह नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर सुरत किंवा आणखी कुठे जाऊन बोलण्यापेक्षा मला समोर येऊन सांगा. मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना केलं.
काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मला कोणीच म्हणालं नाही की आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहात. मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटलं, दु:ख झालं आणि धक्काही बसला की माझ्याच माणसांना मी मुख्यमंत्री म्हणून नको आहे,अशी भावूक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.
दरम्यान, फेसबुक लाईव्हद्वारे उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे. तर पक्ष आणि शिवसैनिकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा या मागणीवर एकनाथ शिंदे ठाम आहेत. त्यामुळे या प्रकरणाला कोणतं वळण लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
…आणि निरोपाच्या भाषणात उद्धव ठाकरे चक्क गोष्ट सांगायला लागले!
“आज संध्याकाळी मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतोय”
उद्धव ठाकरे त्यांची भूमिका स्पष्ट करणार, ट्विट करत म्हणाले…
मोठी बातमी! एकनाथ शिंदेनी ट्विट करत केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा
‘उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरु’, नवनीत राणा कडाडल्या
Comments are closed.