बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भेटीसाठी थांबलेल्या संजय राठोडांना मुख्यमंत्र्यांनी दिला अवघ्या 2 मिनिटांचा वेळ!

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चांगलेच अडचणीत सापडलेले महाविकास आघाडी सरकारचे वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगला गाठला. मात्र, संजय राठोड यांना वर्षा बंगल्याबाहेर जवळपास दिड-तास वाट बघावी लागली आहे. संजय राठोड हे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चांगलंच चर्चेत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणात या भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असतानाच मात्र आता संजय राठोड यांना वर्षा बंगल्यावर दीड-तास वाट बघायला लावून फक्त 2 मिनिटे भेटण्याची वेळ मुख्यमंत्र्यांनी दिली.

तीन पक्षाच्या आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री संजय राठोड प्रकरणात नाराज असल्याची चर्चा माध्यमात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना वर्षा बंगल्यावर वाट पाहायला लावणे म्हणजे ते राठोड यांच्यावर नाराज असल्याची ही खून असू शकते.

मुख्यमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्न उपस्थित झालेला असताना आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राठोड मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असताना त्यांना मोठी वाट बघावी लागली होती आणि शेवटी फक्त 2 मिनिटांचा वेळ मिळाला.

थोडक्यात बातम्या

“…म्हणून मृत्यूपूर्वी त्यांनी स्टेडियम आपल्या नावावर करून घेतलं”

काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं राहुल गांधींना फटकारलं, म्हणाले…

…अन् त्याने लोखंडी रॉड डोक्यात मारून वडिलांच्या केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

“मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा वर्षभराचा प्रवास”

“चंद्रकांत खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना निवडणुकीत उभं केलं होतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More