बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री चांगलं काम करतायेत; राज्यपालांचा पवारांजवळ निरोप

मुंबई |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी कोरोनाच्या कठीण काळात तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील चांगलं काम करत आहेत, असं राज्यपाल शरद पवार यांना म्हणाले. दस्तुरखुद्द पवारांनीच ही माहिती दिली आहे.

राज्यपालांनी दोनवेळा आमंत्रण दिले होते. त्यामुळे मी त्यांना काल भेटायला गेलो. मी कृषीमंत्री असताना कोश्यारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, असं पवारांनी सांगितलं तसंच राज्यपाल आणि आमच्यात जुन्या आठवणींवर देखील गप्पा झाल्याचं पवारांनी यावेळी सांगितलं.

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. कोरोना महामारीच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासंबंधी सगळी ताकद लावयचं हे सरकारचं उदिष्ट आहे. सरकार आणि प्रशसान त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत, असं पवार म्हणाले.

दुसरीकडे शरद पवार यांनी काल मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली. मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पवारांच्यात कोरोनासंबंधी दीर्घ चर्चा झाली. मुंबई-पुणे-मालेगावला संख्या वाढते आहे यावरही विचारमंथन झालं तसंच उपाययोजनांवर देखील आम्ही बोललो, असं शरद पवार यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर मी मातोश्रीवर एकदाच गेलो होते. त्यानंतर मी गेलो नव्हतो. काल बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या. तसंच इतरही काल गप्पा झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

प्रत्येक गरीबाच्या खात्यावर दरमहा हजार रुपये जमा करा!

‘कठोर निर्णय, धडक अंमलबजावणी’, नागपुरात कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न!

महत्वाच्या बातम्या-

मातोश्रीची पायरी का चढलो?; शरद पवार यांनी सांगितलं कारण

कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचा नवा खुलासा; ‘या’ खुलाशानं एकच खळबळ

माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांचा पियुष गोयलांना टोला, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More