महाराष्ट्र मुंबई

राजस्थानमधील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरातांची तासभर बैठक

मुंबई | राजस्थानमधील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची बैठक पार पडली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात जवळपास तासभर बैठक झाली.

मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

राजस्थानमध्ये काँग्रेस अंतर्गत सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चाचपणी सुरु केली आहे. महाविकासाआघाडी सरकारला फटका बसू नये यासाठी काँग्रेसची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यावरुन वाद निर्माण झाला होता. यानंतर आधी चर्चा-मग बदल्या असे सूत्र महाविकासआघाडीत ठरले आहे.  त्यानुसार बदल्या करण्याआधी महाविकासआघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षाचे नेते चर्चा करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआवर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्यांना अटक

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात, पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही- किशोरी पेडणेकर

भाजपला घोडेबाजाराची सवय आणि पैशाचा उन्मात आहे- यशोमती ठाकूर

बारावीच्या निकालात ‘या’ मुलीने मिळवलेले गुण वाचून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल!

‘येत्या दोन महिन्यात परीक्षा घेणं अशक्य’; परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या