Top News महाराष्ट्र मुंबई

“देशात सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव आलं ते उगीच आलं का?”

मुंबई |  सरकार पाडायच्या गोष्टी करता आधी चालवून तर दाखवा असं आव्हान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्यांच्या या आव्हानावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. चालवून तर दाखवा म्हणजे आत्ता आम्ही काय रांगतोय का, असा टोला त्यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडी कुटुंब नसून लिव्ह अन रिलेशनशीपमध्ये आहे. यांच्यात विसंवाद आहे, कसल्याही प्रकारचा ताळमेळ नाहीये. लवकरच हे सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “ते म्हणतात सरकार चालून तर दाखवा म्हणजे आत्ता आम्ही काय रांगतोय का?, देशात सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव आलं ते उगीच आलं का?”

दरम्यान, हे सरकार मी एकटा चालवत नाही.  माझे सर्व सहकारी सक्षम आहेत. आम्ही तिन्ही पक्षांचे सहकारी मिळून हे सरकार चालवतो आहे. त्यामुळे राज्याच्या विरोधी पक्षाने सरकार चालण्याची काळजी करू नये, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या-

मंदिरासाठी कुणी काय केलंय हे आम्हाला माहितीये, जेव्हा वेळ आली होती…., उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

कोरोनानं ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या छातीत झालीय बुरशी; कोरोनाचं धक्कादायक वास्तव!

देशात कोरोनाचा हाहाकार, कालच्या दिवसातली धक्कादायक आकडेवारी….

“माझ्याबद्दल फार वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत” रिया चक्रवर्तीचा भावुक व्हिडीओ व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या