बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली ‘ही’ विनंती

मुंबई | आर्थिक वर्ष 2018-19 चे सुधारित आणि उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे राज्यात नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अनेक सेवा-सुविधांच्या डेडलाईनही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

234 बी अंतर्गत व्याज वाचवण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच 30 एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. फेब्रुवारी 2020 ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 22 मार्च आहे. त्यालाही मुदतवाढ देण्यास मुख्यमंत्र्यांनी सुचवलं आहे.

दरम्यान, मुदतीनंतर करभरणा केल्यास लागणारा दंड, शुल्क आणि व्याजदेखील माफ करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय निर्णय घेतात, याकडे करदात्यांचे डोळे लागले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

जनता भाजपला माफ करणार नाही- कमलनाथ

पंतप्रधानांकडे आवश्यक त्या मदतीची मागणी करणार- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

“आपणच आमचे खरे हिरो आहात, एकत्रितपणे ही लढाई नक्की जिंकू”

“निर्भयाला न्याय मिळाला आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळण्याची”

“माझ्या देशात महिलांना न्याय मिळतोच याचा मला अभिमान”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More