बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मे अखेरीस राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रीन झोन दिसला पाहिजे; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई | लॉकडाउन करणं सोपं होतं. पण आता त्यात शिथिलता आणताना खरी परीक्षा सुरु झाली आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस हे ज्या पद्धतीने कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत त्यासाठी त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मात्र मला येणाऱ्या काही दिवसांत ठोस रिझल्ट दिसला पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काही जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाउनचं योग्य पालन होत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. मला कल्पना आहे की आपण प्रयत्न करीत आहात पण मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन आलेला दिसला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी सर्वांना दिले आहेत.

दरम्यान, अर्थचक्रही सुरु राहिलं पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली. पण याचा अर्थ लॉकडाउनमधून मोकळीक मिळाली असे नाही. सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे येतील ते पाहावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले

“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”

महत्वाच्या बातम्या-

उठवलेली दारूबंदी हे शासनाचं अतर्क्य पाऊल- डॉ. अभय बंग

“व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस”

UPSC परीक्षेसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More