बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनचे नियम- एकाच ठिकाणी संपूर्ण यादी

मुंबई | महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे जे महत्त्वाचे नियम सांगितले आहेत, ते खालीलप्रमाणे-

लॉकडाऊनचे महत्त्वाचे नियम-

उद्या (ता. १४ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून राज्यात संपूर्ण संचारबंदी लागू

राज्यात कुणालाही अनावश्यक बाहेर फिरता येणार नाही

अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहणार

मेडिकल तसेच किराणा दुकाने सुरु राहणार

राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

राज्यातील रेल्वे तसेच लोकल बस सेवा सुरु राहणार, मात्र या सेवांचा वापर अत्यावश्यक सेवेसाठीच करता येणार

शेतीशी निगडीत खत दुकाने, शीतगृहे सुरु राहणार

शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा, शेतीकाम सुरु ठेवण्यास परवानगी

औद्योगिक क्षेत्रात जे उद्योगधंदे आहेत ते सुरु राहणार

उद्योगधंद्यांनी आपल्या कामगारांना ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था करावी

राज्यातील हॉटेल बार तसेच रेस्टॉरंट बंद राहणार

हॉटेल्ससाठी तसेच खाद्यपदार्थांसाठी फक्त पार्सल सेवा सुरु

पुढचा एक महिना शिवभोजन थाळी मोफत मिळणार, तब्बल २ लाख थाळ्या मोफत

गरजूंना एका महिन्यासाठी तीन किलो गहू आणि २ किलो तांदूळ मिळणार, याचे सात कोटी लाभार्थी

राज्यात पेट्रोलपंप सुरु राहणार

अत्यावश्यक सेवेशी निगडीत उद्योग सुरु ठेवण्यास परवानगी

राज्यातील नोंदणीकृत कामगारांना १५०० रुपये देणार

राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना देखील निधी

राज्यातील अधिकृत फेरीवाल्यांना देखील प्रत्येकी १५०० रुपये

राज्यातील परवानाधारक रिक्षाधारकांना प्रत्येकी १५०० रुपये मिळणार

खावटी कुटुंब योजनेतील आदिवासींना २००० हजार रुपये मिळणार

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा एका क्लिकवर…

महाराष्ट्रात उद्या रात्रीपासून कडक संचारबंदी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे LIVE, आताच पाहा व्हिडीओ

“15 दिवसांचा लॉकडाऊन केला तर काय बिघडणारे?”

“मुख्यमंत्री आज रात्रीपासून लगेच लॉकडाऊन करणार नाहीत”

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More