Top News महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीरपणे काँग्रेसला फटकारलं, म्हणाले…

मुंबई | मुख्यमंत्र्यांच्या शासकीय ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. त्यानंतर ही ऑपरेटरकडून चुकून झालं असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र यावरून काँग्रेसनेही शिवसेनेवर आक्षेप नोंदवला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला टोला लगवाला आहे.

औरंगाबादचा उल्लेख मुख्यमंत्री कार्यालाकडून अधिकृतपणे संभाजीनगर असा केला जात आहे. यावर उत्तर देताना, औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे आमच्या कॉमन अजेंड्यामध्ये जो सेक्युलर शब्द आहे त्यात औरंगजेब बसत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

वर्षानुवर्षे आम्ही संभाजीनगर असाच उल्लेख करत आलो आहोत आणि पुढेही तेच करणार. बाळासाहेबांनीही हाच उल्लेख केला असल्याची आठवणही उद्धव ठाकरेंनी करून दिली.

दरम्यान, औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख शासकीय कागदपत्रांमध्ये केला यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला होता. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या या टीकेवर काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळून अपघात!

‘रिया चक्रवर्ती माझी..’; रोडिज फेम राजीव लक्ष्मणनं त्या फोटोबाबत दिलं स्पष्टीकरण, म्हणाला….

मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी उर रहमान लख्वीला 15 वर्षांची शिक्षा

“संभाजी महाराज आमचं आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान”

उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांविरोधात राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात घंटानाद आंदोलन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या