बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अंगणवाडी सेविका प्रशासनाचा कणा आहेत, तिसरी लाट आली तर तुमची मदत हवी”

मुंबई | आशा आणि अंगणवाडी सेविका आपल्या प्रशासनाचा पाठकणा आहेत. त्यांनी काम करावं म्हणून कौतुक करत नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आशा सेविकांना मानाचा मुजराही केला. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. यावेळी तज्ञ डॉक्टरही उपस्थित होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना अधिक धोका आहे. तिथं तुमचं काम जास्त आहे. याच्याआधी तुम्ही लोकांच्या घरी जाऊन त्यांची पाहणी, तपासणी करण्याची काम केली आहेत. तुम्ही महामारीच्या काळात संपुर्ण महाराष्ट्राला कुुटुंबाप्रमाणे तळहाताच्या फोडासारखं झपलं होतं. अशाच प्रकारे हेच हात तिसरी लाट थोपवताना हवे असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

आपण दुसरी लाट ओळखायला उशिर केला आणि संकट आलं. पावसाळ्यात कोविड आणि नॉन कोविड ओळखणं कठीण झालं आहे. येत्या दोन तीन दिवसांत मुंबई आणि जवळच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आव्हानं समोर येणार आहेत परंतू त्यांना न डगमडता करोना संकट थोपवायचं आहे. तिसरी लाट येऊ द्यायची नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकार येण्याअगोदर आशा सेविकांनी काढलेल्या मोर्चाची आठवण आहे. तुमच्या अपेक्षांकडे लक्ष देणार तेवढ्यात कोरानाचं संकट आलं. पण आम्ही तु्हाला विसरलो नाही. आम्हाला थोडा अवधी द्या लवकरच मार्ग काढू, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या- 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशवासियांशी साधणार संवाद

सकारात्मक बातमी! रविवारी देशात सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

“‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या”

‘आम्हाला हनीमूनला जाण्यासाठी ई-पास हवाय!’

पुण्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या ‘या’ हॉटेलवर पोलिसांची धाड; तब्बल 41 जणांवर गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More