बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लक्ष्मणरेषा ओलांडू नये, अन्यथा काय होतं ते कोरोनाने दाखवलं”

मुंबई | निसर्गाचं संवर्धन कसं करता येईल हे सांगणारी आणि यासाठी तांत्रिक आणि शास्त्रीय सल्ला देणारी संस्था स्थापन करा. विशेष म्हणजे या संस्थेचा सल्ला बंधनकारक असला पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने वन विभागाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.

निसर्ग अजूनही आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेने पाहतो आणि आपल्याला जपत आहे. पण लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होतं हे कोरोना विषाणुने दाखवून दिलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हणाले. रामायणात लक्ष्मणाला वाचवण्यासाठी संजीवनी वनस्पती आणावी लागली. माझ्या मते संजीवनी म्हणजे काय तर आपल्यासोबत जगणारी आणि आपल्याला जगवणारी जी गोष्ट आहे ती संजीवनी, आपण ती जपली पाहिजे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आले, यावर्षी तौक्ते चक्रीवादळ आले. चक्रीवादळ आले की आपण हवामान बदलाचे कारण सांगतो. पण हवामान बदल होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का?, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, आरेचं जंगल आपण वाचवलं. शहरात जंगल आणि या जंगलामध्ये प्रचंड जैवविविधता असलेले आरेचे क्षेत्र आपण जपलं. जगात अशाप्रकारे शहरात जैवविविधता असलेलं मुंबई हे कदाचित एकमेव महानगर असेलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

नियतीचा काही वेगळाच डाव होता! आईचा कोरोनामुळे मृत्यू, सांत्वनासाठी आलेल्या मुलीचा….

आमदार रोहित पवारांनी केंद्र सरकारला दिला लसीकरणाबाबत ‘हा’ सल्ला 

एवढं चांगलं काम करूनही टीका, विरोधक ब्लॅक फंगसप्रमाणे आहेत- संजय राऊत

15 दिवसांपुर्वी जामिनावर सुटलेल्या औरंगाबादमधील गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

‘या’ राज्यात कोरोना बरा करणाऱ्या चमत्कारी औषधासाठी देशभरातून लोकांनी केली गर्दी, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More