बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…नाहीतर कोरोनाची तिसरी लाट येण्याअगोदर दुसरीच लाट परत उलटेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मुंबई | कोरोना सुरूवातीला आला त्यावेळी पुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. कोरोना कमी झाल्यानंतर हळूहळू सर्व काही नेहमीप्रमाणे सुरळीत झालं. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल कोणालाही काहीच कल्पना नव्हती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनही तयार नव्हतं. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली.  आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे त्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र वाढलेल्या गर्दीवर मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

कोरोनाची दुसरी लाट आपण थोपवली आहे मात्र अद्यापही कोरोनाची दुसरी लाट पुर्णपणे संपली नाही. आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट कधी येईल हे काही सांगता येत नाही, परंतू आताची गर्दी बघता हीच लाट पुन्हा उलटेल का?, हा मोठा धोका आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मालाड येथील कोविड केअर सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा डेल्टा प्लस हा विषाणू आहे. डेल्टा प्लसने अजून रंग दाखवले नाहीत. डेल्टा प्लस विषाणू अजुनही राज्यात आहे त्यामुळे गर्दी टाळली नाही तर कोरोनाची तिसरी लाट येण्याअगोदर दुसरीच परत उलटेल, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी वाढत्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त करत नागरिकांना सावधतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, कलानगराला लागूनच एमएमआरडीएचा रस्ता झाला. त्यावर उड्डाणपूल झाला मग धारावीचा रस्ता झाला. मोजक्याच गाड्या दिसत होत्या तिथंही आज वाहतूक कोंडी होत आहे. रहदारी वाढत असल्याने ट्राफिक वाढत चाललं आहे. त्यावर आज तोडगा काढला आहे. एमएमआरडीएचं कार्यालयं झालं मात्र ट्राफिक जाम होणाऱ्या ठिकाणी एमएमआरडीएची कार्यालये सुरू करायची का?, असा मिश्किल सवाल ठाकरेंनी केला.

थोडक्यात बातम्या- 

‘… तो वाघच नसतो त्याला पालतू कुत्रा म्हणतात’; नितेश राणे

डेल्टा प्लस व्हेरिएंटची चिंता करू नका; CSIR शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा, म्हणतात…

‘तुझ्यात जीव रंगला’ मधील वहिणीसाहेबांच्या बाळाचा चेहरा अन् नाव आलं समोर

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या खाली, पाहा आकडेवारी

“20 टक्के लसीकरण झालेल्या देशात कोरोनाची तिसरी लाट नाहीच”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More