मुंबई | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचं शारदाताई टोपे यांचं निधन झालं आहे. शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंचर ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शारदाताई टोपे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे तसंच तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.
शारदाताई यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. शारदाताई टोपे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून म्हटलं आहे, “राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. काही महिन्यांपासून त्या रुग्णालयात असताना देखील राजेश टोपे यांनी कोरोनाविरुद्ध लढून महाराष्ट्राची काळजी घेतली. शारदाताई टोपे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना”
आरोग्यमंत्री @rajeshtope11 जी यांच्या मातोश्री शारदाताई यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. काही महिन्यांपासून त्या रुग्णालयात असताना देखील राजेश टोपे जी यांनी कोरोनाविरुद्ध लढून महाराष्ट्राची काळजी घेतली. शारदाताई टोपे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏼
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 1, 2020
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांचे आढावा दौरे, अनेक रूग्णालयांना भेटी, सततच्या बैठका यामधूनही वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे. मात्र ज्यांनी महाराष्ट्राची उर्जा जिवंत रहाण्यासाठी गेली 3 महिने रात्रीचा दिवस केला त्यांच्याच उर्जास्त्रोत आता कायमचा हरपला आहे, अशी भावूक प्रतिक्रिया आता उमटत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राजेशभैय्या सारखा सुपुत्र महाराष्ट्राला देणाऱ्या शारदाताई आपल्यातून गेल्या, सुप्रिया सुळे हळहळल्या
आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आईचे दीर्घ आजाराने निधन
“यूएई सुरक्षित नाही, IPL 2020 भारतातच खेळवा”
पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता