बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी!!! महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन?; मुख्यमंत्र्यांचे तयारीला लागण्याचे आदेश

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच्या पार्श्वभुमीवर राज्यात कडक निर्बंध लागु केले जाऊ शकतात असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला यापुर्वीच दिले होते. तसेच कोरोना संदर्भातील नियम पाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं. परंतु महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत असताना आज मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाच्या सुचना दिल्या आहेत.

कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य सुविधा आणि रूग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याचं निदर्शनास आल्याने बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लाॅकडाऊनसारखे कडक निर्बंध लागु करावे. अशा सुचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितलं की, एकीकडे आपण कोरोना महामारीच्या गंभीर संकटासोबत लढत असतानाही अर्थव्यवस्था कशी सुरु राहील याचा पुरेपुर प्रयत्न करत आहोत, पण काही समाजातील घटक अजूनही या परिस्थितीला जाणिवपुर्वक गांभिर्याने घेत नसल्याचं दिसुन येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन करावं लागेल असं समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचं नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना दिल्या आहेत.

महाराष्ट्रात मर्यादित स्वरूपात लाॅकडाऊन लावण्यात यावा तसेच त्याची कार्यपद्धती मदत व पुनर्वसन प्रधान सचिवांनी तयार करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत. तसेच ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध राहावा त्यासाठीही नियोजन करण्याच्या सुचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा लाॅकडाऊन होणार हे जवळपास निश्चित होताना दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या –

गब्बर आणि हिटमॅन दोघंही सुपरहिट; केला ‘हा’ मोठा कारनामा

“उद्धव ठाकरेंना कणा नाही, आता नवीन सरकार यावं”

शरद पवार-अमित शहा भेट खरोखर झाली का?; अमित शहांचं सर्वात मोठं वक्तव्य

संजय राऊतांकडून ‘अपघाती गृहमंत्री’ म्हणून उल्लेख, गृहमंत्र्यांना प्रश्न विचारल्यावर पाहा काय झालं!

शरद पवारांनी अहमदाबादमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेतली?; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More