मुंबई | ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन आहे. ते 81 वर्षांचे होते. चारच दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाला होती. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
महाराष्ट्राच्या साहित्य विश्र्वातील अमुल्य असे एक साहित्य ‘रत्न’ निखळले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे, असं त्यांनी म्हटलंय.
रत्नाकर मतकरी यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ आनंद दिला. आमच्या पिढीतल्या लहानांचे भाव विश्व साकारले, महाराष्ट्राचे साहित्य- नाट्य क्षेत्र समृद्ध केले. त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.
रत्नाकर मतकरी यांनी गूढकथा हा साहित्यप्रकार त्यांनी आपल्या खास शैलीने फुलविला होता. त्यांच्या साहित्याचे अनेक चाहते होते. त्या चाहत्यांना ते आज कायमचं सोडून गेले. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“आम्ही मोदींसारखे ड्रामेबाज नाही, जेव्हा मत हवं असतं तेव्हा ते मजुरांचे पाय धुतात”
उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; सोमय्यांचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा
महत्वाच्या बातम्या-
बारामतीत पुन्हा कोरोनाबाधित रूग्ण आढळला; पाहा ‘मुंबई ते बारामती कोरोना कनेक्शन…!’
केंद्रावर टीका करण्याआधी तुमच्या तिजोरीतून महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगा; चंद्रकांतदादा भडकले
आत्मनिर्भर पॅकेज: अदानी, वेदांता, टाटा पावर, अनिल अंबानीच्या रिलायन्सला मोठा फायदा
Comments are closed.