बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल”

मुंबई | पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहा:कार उडाला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करणार आहेत. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

अतुल भातखळकर यांनी उद्धवठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे. इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झालेत. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील. दुपारी तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी 3.20 वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील.

दरम्यान, राज्यात पावसामुळे झालेल्या विविध ठिकाणच्या दुर्घटेनत आत्तापर्यंत एकूण 76 लोकांचा मृत्यू झाला असून 60 लोक बेपत्ता आहेत. तसेच 90 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं. या पूरात माणसांबरोबर जणावरं देखील दगावली आहेत. आतापर्यंत 75 जणावरं दगावली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरातील 209, सांगलीमधील 120, पुण्यात 421 गावं बाधित झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

तळीये गावात क्षणात होत्याचं नव्हतं झालं, सलग 40 मृतदेह रांगेत!

प्रसिद्धीसाठी कायपण! ‘या’ 7 अभिनेत्रींच्या न्यूड फोटो-व्हिडीओंचा इंटरनेटवर धुमाकूळ

राज कुंद्राला ‘या’ अभिनेत्रीचा सपोर्ट, म्हणाली…

शेअर मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांनो… ‘डीमॅट’च्या नियमात 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल!

शिल्पा या प्रश्नांची उत्तरं दे… चौकशीत क्राईम ब्रांचनं विचारले हे 10 प्रश्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More