बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी ठोस दिशा दाखवावी, आम्ही अंमलबजावणी करू- उद्धव ठाकरे

मुंबई |  देशव्यापी तिसरा लॉकडाऊन संपायला काही दिवस शिल्लक असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांनी लॉकडाऊनसह प्रमुख विषयांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी विविध राज्यांत कोरोनाबाबतची असलेली सद्यस्थिती जाणून घेत उपाययोजनांची माहिती घेतली.

लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी निश्चितआणि ठोस दिशा दाखवावी, आम्ही सर्व राज्ये त्याप्रमाणे अंमलबजावणी करू.आपण एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला.मे, जून,जुलैमध्ये या रोगाचा उच्चांक येऊ शकतो असे बोलले जाते.अशावेळी लॉकडाऊनबाबत काळजीपूर्वक कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात लॉकडाऊन आता हळूहळू शिथील होत आहे. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करतांना आपण ग्रीन झोन्समध्ये उद्योग-व्यवसाय सुरु होतील असे पाहिले आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधानांना सांगितलं.

दुसरीकडे मुंबईतील उपनगरीय लोकल सेवा अत्यावश्यक लोकांसाठी किंवा सेवेसाठी सुरू कराव्यात, महाराष्ट्राचा जीएसटीचा परतावा द्यावा या आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा केली.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

सॅमसंगने ‘ती’ ऑफर 17 मेपर्यंत वाढवली; एसी, फ्रिज-टीव्हीवर मिळणार कॅशबॅक

राजेश राठोड की राजकिशोर मोदी? काँग्रेसचा उमेदवार कोण?

महत्वाच्या बातम्या-

“लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय आहे? की फक्त डोक्यावर पडल्यासारखं फेसबुक लाईव्ह करणार??”

सरकारी कर्मचाऱ्यांची पगारकपात होणार का?; मोदी सरकारने केला मोठा खुलासा

केंद्राने महाराष्ट्राचा GST परतावा द्यावा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More