बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्याग, समर्पणाच्या शिकवणीचा वसा घेऊ या’, मुख्यमंत्र्यांकडून बकरी ईदच्या शुभेच्छा

मुंबई | ‘त्याग आणि समर्पणाची शिकवण देणाऱ्या बकरी ईदच्या संदेशाचा वसा घेऊन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (१ ऑगस्ट रोजी) साजरा होणाऱ्या बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, मुस्लिम बांधवांचा हा पवित्र बकरी ईद  सण त्यागाचा संदेश देतो. त्याग आणि समर्पणातून मानव कल्याणाचा विचार सांगतो. याशिवाय सण साजरा करताना गोरगरीबांचाही विचार करण्यास सांगतो. मानवतेच्या विकासाच्या दृष्टीने दिलेल्या या संदेशाचा वसा घेऊन आपण समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे हा सण आरोग्याची काळजी घेऊन आणि नियमांचे पालन करून शांततेत साजरा करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शासनाने घालून दिलेले नियम आणि अटी पाळून बकरी ईद आनंदाने साजरी करावी, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ दोन शहरांत 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर निवृत्त; शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले…

अहो आश्चर्यम!; ‘ही’ कंपनी तंबाखूपासून बनवतेय कोरोनाची लस, लवकरच…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More