बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र मास्कफ्री होणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

रायगड | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असला तरी कोरोना नियमांचे पालन करणं अजूनही बंधनकारक आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत आहे त्यामुळे महाराष्ट्र मास्कफ्री कधी होणार असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. जनतेच्या या प्रश्नावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मास्क कधी काढणार असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. मास्क काढण्याबाबत आत्ताच काही सांगता येत नाही. आपल्याला मिळालेला हा काळ लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे लसीकरणावर भर द्या, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान, कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे मास्क वापरावा की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे यांनी मास्कबद्दल स्पष्ट सांगितल्याने जनतेला अजून काही काळ मास्क वापरणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

“दिशा सालियन प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार, सर्व पुरावे तयार”

दारू पिण्याचं वय केलं कमी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

उर्फी जावेदचे ‘या’ दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाली…

“उद्धव ठाकरे स्वत: दारू पित नाहीत, मग जनतेला वाईन का पाजत आहेत?”

दिशा सालियनला ‘त्या’ रात्री घेऊन गेलेली ती गाडी सचिन वाझेची?, नितेश राणेंचा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More