मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लोकल, मंदिर आणि जीम इतक्यात सुरु होणार नाही असं स्पष्ट केलंय.
मुख्यमंत्री म्हणाले, मला गर्दी नकोय. राज्यातंर्गत ट्रेन वाहतूक सुरु करण्यात आली आहे. लोकलची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. ती मागणी मान्य झाल्यानंतर आणखी काही लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात येईल.
जीम सुरु करण्याची मागणी होत आहे, त्याबद्दल लवकर नियमावली देण्यात येईल. जीममध्ये व्यायाम करताना, हार्टच पम्पिंग रेट जास्त असतो. त्यामुळे श्वासोश्वास वाढतो आणि त्यातून करोनाचा प्रसार होऊ शकतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
“…तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे”
“मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही”
गुड न्यूज! मुंबईत 84 टक्के रूग्ण कोरोनामुक्त
“बेकायदेशीर काम कायद्याने थांबवा, सुरुवात भाजपपासून करा”
Comments are closed.