मुंबई | महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतलीये. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.
“आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, आमचं हिंदुत्व सोयीचं नाहीये. आमचं हिंदुत्व आमच्या धमन्यांमध्ये भिनलेलं आहे. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का?,” अशा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय.
मुख्यमंत्री पुढे म्हणालेत, “आम्ही कधीच सोयीचं हिंदुत्व घेतलं नाही. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं, ‘जनतेच्या हिताचं असेल ते कर, मग ते आपल्या गैरसोयीचं असलं तरी जनतेसाठी कर!’ राजकारणासाठी तुम्ही हिंदुत्व नका घेऊ.”
राज्यपाल कोश्यारी यांनी मंदिर उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. या मुद्द्यावरूनतुम्ही हिंदुत्व सोडलंय का?, असा सवाल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपकडून करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय नौदलाचं MiG-29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळलं!
“भगवा उतरवणं सोडा; आधी मुंबई महापालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून पहावं”
ईडीचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा
‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’; शहीद जवान यश देशमुख यांच्या अखेरच्या संवादाने पाणावले डोळे
गुजरातमध्ये कोविड रूग्णालयाला भीषण आग, 5 जणांचा मृत्यू