मुंबई | शेतकरी ‘कर्जमुक्ती’ म्हणजे आपण शेतकऱ्यांवर उपकार करत नसून त्यांचे आशीर्वाद घेतोय अशा भूमिकेतून शेतकऱ्यांना मदत करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच ‘वर्षा’वर बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 88% पात्र शेतकऱ्यांचा डेटा पोर्टलवर अपलोड झाला आहे. आत्तापर्यंत 32 लाख 16 हजार 278 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर नोंद झाली आहे तसेच 95% आधार जोडणी पूर्ण झाली असून यासाठी सर्व बँकांचे संपूर्ण सहकार्य असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने 6 महिन्यांचे काम अवघ्या 35 दिवसांत पूर्ण केलं. हा ‘जोश’ असाच टिकवून ठेवा आणि 15 एप्रिलपर्यंत संपूर्ण अंमलबजावणी करा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला दिल्या आहेत.
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आता आपलं सरकार केंद्र, बँका, रेशन दुकानदार यांच्या प्रशिक्षणाकडेही लक्ष द्यावं. 21 फेब्रुवारीपासून गावोगाव याद्यांची प्रसिद्धी आणि आधार प्रमाणीकरण सुरू होणार आहे. तसेच 11 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष यंत्रणा कशी काम करते? याची पडताळणी सुरू होणार असल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
“कर्जमुक्ती म्हणजे आपण शेतकऱ्यांवर उपकार करीत नसून त्यांचे आशीर्वाद घेतो आहोत अशा भूमिकेतून त्यांना मदत करावी.”
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/UtGHRSP5ya— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 7, 2020
“महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने सहा महिन्यांचे काम अवघ्या ३५ दिवसांत पूर्ण केले. हा ‘जोश’ असाच टिकवून ठेवा व १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण अंमलबजावणी करा.”
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/W4VtGO4ahB— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 7, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“नाईट लाईफमुळे श्रीमंतांच्या मुलांची सोय झाली, पण शेतकऱ्यांच्या मुलांचं काय?”
काम होत नसलं की बहाणे सांगायचं; फडणवीसांचा अजित पवारांना टोला
महत्वाच्या बातम्या-
पंकजा मुंडे भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्ष?, तर चंद्रकांत पाटलांना ‘हे’ पद मिळणार?
गणपतीच्या रांजणगावमध्ये अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड
हिंगणघाटच्या पीडितेचा संपूर्ण खर्च मी उचलतो- आनंद महिंद्रा
Comments are closed.