बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमच्याकडे तर तक्रारदारच गायब आहे”, मुख्यमंत्र्यांनी लगावला परमबीर सिंगांना टोला

औरंगाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान परमबीर सिंग प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांना टोला लगावला आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले,”1958 पासून एक आरोपी गायब असल्याचं तुम्ही म्हणता. पण आमच्याकडे तर तक्रारदारच गायब आहे. कुठे गेला माहित नाही तरीही केस सुरूच आहे. कुठे पळून गेला माहित नाही. पण आरोप केलेत ना.. मग खणून काढ… खणलं जातंय.., चौकशी सुरु आहे”, अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे परमबीर सिंग यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “या पद्धतीला आता आळा बसण्याची गरज आहे. अनेकदा कोर्टात जाऊन आयुष्य निघून जातं. त्याचा खर्च परवडत नाही, असंही म्हणाले आहेत. याशिवाय “मी तुम्हाला कोर्टासाठी इमारत देणार आहे आणि आपल्याच काळात ती इमारत पूर्ण करणार आहे, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून धक्कादायक आरोप केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मात्र परमबीर सिंग गायब झाले आहेत. यावरूनच मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता परमबीर सिंग यांना हा टोला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आर्यन खानला गांजा दिला होता, पण….’, अनन्या पांडेचा मोठा खुलासा

‘…ते आपल्याला मोडून काढायचं आहे’, मुख्यमंत्र्यांचा ‘हा’ महत्त्वाचा निर्धार

देशातील कोरोना रूग्णसंख्येतील चढउतार सुरूच, पाहा गेल्या 24 तासातील आकडेवारी

एसटी प्रवास महागणार, इंधन दरवाढीचा आता प्रवाशांनाही बसणार मोठा फटका

शेतकऱ्यांची धाकधुक पुन्हा वाढणार?; हवामान विभागाचा ‘या’ भागात पावसाचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More