Top News महाराष्ट्र

मुख्यमंत्री इन अ‌ॅक्शन मोड; गृहमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय उद्धव ठाकरेंनी फिरवला!

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रालया केलेल्या 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या रद्द केल्यात. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी या सर्व बदल्या रद्द केल्यात.

मिळालेल्या माहितीनुसार, IPS अधिकाऱ्यांच्या या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांशी सल्ला मसलत करण्यात आली नव्हती. कदाचित याच कारणाने मुख्यमंत्र्यांनी बदल्या रद्द केल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2 जुलैला या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. हे सर्व अधिकारी हे मुंबई पोलीस दलातले असून DCP दर्जाचे आहेत. आज या सर्व 10 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रद्द करण्यात आल्या असून त्यांना पुर्वीच्याच ठिकाणी राहण्यास सांगण्यात आलंय.

सध्या राज्यात प्रत्येकजण कोरोनाविरूद्ध लढाई लढतोय. त्यात पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची  आहे. अशा परिस्थितीत सगळ्यात महत्त्वाचं मानल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांच्या 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणं याला वेगळं महत्त्व आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘आत्मनिर्भर’च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल- अनिल परब

वाट्टेल ती किंमत मोजून ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण …- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या-

‘या’ नेत्याची जीभ घसरली, निर्मला सीतारमण यांची केली काळ्या नागिणीशी तुलना

धक्कादायक! पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण

100 जणांना वाढदिवसाची पार्टी देणाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या