बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंनी ना एकमेकांकडे पाहिलं, ना नमस्कार केला!

सिधुंदुर्ग | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील वाद अजूनही संपलेला नाही. याचंच उदाहरण चीपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी दिसून आलं. चीपी विमानतळाच्या अनावरणाप्रसंगी अनेक नेते उपस्थित होते. राणेदेखील यावेळी उपस्थित होते. मात्र यादरम्यान मुख्यमंत्री आणि राणे यांनी एकमेकांकडे पाहिलं नसल्याचं दिसून आलं.

कार्यक्रमासाठी अजित पवार, बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते. नारायण राणे कार्यक्रमाला आल्यानंतर अजित पवार आणि थोरात यांनी राणेंना नमस्कार केला. पंरतु मुख्यमंत्र्यानी काही राणेंकडे पाहिलं नाही. ना राणेंनी मुख्यमंत्र्याना नमस्कार केला नाही. त्यामुळे राणे विरूद्ध हा वाद संपला नसल्याचं पाहायला मिळालं.

खरंतरं राणे आणि मुख्यमंत्री ठाकरे हे 16 वर्षांनी एकत्र मंचावर आले आहेत. दरम्यान या दोघांमधील वाद तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. पंरतु कार्यक्रसाठी एकाच मंचावर याव लागल्याने तरी या दोघांमध्ये काहीतरी संवाद होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु तसं काहीही घडलं नाही.

आम्ही कोकणात मुख्यमंत्र्याचं स्वागत करू, शिवाय कार्यक्रमाला कोणतंही गालबोट लागणार याची काळजी आम्ही घेऊ, असं नारायण राणे कार्यक्रमापूर्वी म्हणाले होते. मात्र कार्यक्रमाच्या वेळी याउलटच चित्र पाहायला मिळालं. कार्यक्रमात राणेंनी मुख्यमंत्र्याना साधा नमस्कारही न घातल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

“NCB अधिकारी समीर वानखेडेंचे कॉल डिटेल्स तपासा, भाजप नेत्यांचे कॉल दिसतील”

‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे आजचा भाव

पुढील 4,5 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत पुणे महानगरपालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पोस्टाची बंपर योजना, महिन्याला 1500 रूपये गुंतवल्यास मिळू शकतात 35 लाख रूपये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More