Top News महाराष्ट्र मुंबई

“हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे”

मुंबई | हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी धर्मांध शिक्षण देणारे राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे, अशी मागणी भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे व तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तत्काळ थांबवून अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात थेट मदत द्यावी, अशी मागणीसुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

भातखळकर यांनी केलेल्या मागणीची अंमलबजावणी होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.आहे.

महत्वाच्या बातम्या-

बॉलिवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

…म्हणून एनडीएची साथ सोडली- चिराग पासवान

‘स्वतःची लायकी ओळखून…’; उद्धव ठाकरेंना गजनी म्हणणाऱ्या अनिल बोंडेंना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

‘या’ देशात पसरली कोरोनाची दुसरी लाट, लागू केली आणीबाणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या