…आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नीही ‘मी लाभार्थी’च्या जाहिरातीत झळकल्या!

मुंबई | ‘मी लाभार्थी’च्या जाहिरातीवरुन वाद सुरु असताना मुख्यमंत्र्यांच्या पत्नीही आता या जाहिरातीत झळकल्या आहेत. मात्र सरकारच्या नव्हे तर विरोधकांच्या…

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस गायिका आहेत. त्यांचा अमिताभ बच्चन यांच्यासोबत नुकताच एक अल्बम येऊन गेला. यावरुनच त्यांना लक्ष्य करण्यात आलंय. 

“पूर्वी माझी गाणी माझे यजमानही ऐकायचे नाहीत, मात्र भाजप सरकार आल्यामुळे माझ्या गाण्यांचा अल्बम निघाला. होय हे माझं सरकार”, असं या जाहिरातीत म्हणण्यात आलंय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कर्जबुडव्या विजय मल्ल्याचेही असेच पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.