Top News विधानसभा निवडणूक 2019

काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते देखील म्हणाले, आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार…!

मुंबई |  महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असं राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं एकमत झालं आहे. काँग्रेसची मुख्यमंत्रिपदाची मागणी ही निव्वळ अफवा असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

शिवसेना ही एनडीएतून बाहेर पडली आहे. त्यामुळे त्यांनी मोठा त्याग केला आहे. त्यांचा सन्मान राखणं आमची गरज आहे. आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे, असं राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि आमदार नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज पहिलीच संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत कोणताही वादविवाद न होता किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला असल्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या स्पष्टीकरणानंतर शिवसेनेने आता नक्कीच सुटकेचा निश्वास सोडला असणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आता मुख्यमंत्रीपदी कुणाला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काँग्रेस शिवसेनेचं नातं किती जुनं आहे ते पाहा…!

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या